image-whatsapp
image-call

ईश्वर सेवा निवासी अपंग मतिमंद कार्यशाळा, पलूस

ईश्वरसेवा निवासी अपंग मतिमंद कार्यशाळा, पलूस ही संस्था सन २०१४ मध्ये स्थापन झाली असून तिला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सांगली यांची मान्यता आहे. ही शाळा विनाअनुदान तत्वावर कार्यरत असून तिचे उद्दिष्ट बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि समाजाभिमुख बनवणे आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

कार्यशाळेत अगरबत्ती, मेणबत्ती, दोरी, फाइल, पिशव्या तयार करणे, शेती, बागकाम आणि शिवणकाम अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे हातगुण विकसित केले जातात. या माध्यमातून त्यांना कामाची आवड व उत्पन्नाचे साधन मिळते. संस्थेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, समाजाशी संवाद साधण्याची सवय लावणे आणि पालकांचा सहभाग वाढवून घरगुती पातळीवर पूरक वातावरण तयार करणे यावर भर दिला जातो. अशा प्रकारे ही कार्यशाळा विशेष गरज असलेल्या व्यक्तींसाठी आत्मनिर्भरता आणि सन्मानाचे जीवन जगण्याचे माध्यम ठरते.

about

आमची वैशिष्ठे

  • उच्चशिक्षित,तज्ञ व अनुभवी अध्यापक वृंद
  • विध्यार्थी शिक्षक प्रमाण 13:1
  • प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 13 विध्यार्थी
  • योगासन व प्राणायम प्रशिक्षण
  • मुलांचा आवडी व रुचिनुसार विविध हस्त कलांचे प्रशिक्षण
  • स्वावलंबनाचे व व्यवसायपूर्ण कौशल्याचे प्रशिक्षण
  • मुलांमध्ये असलेल्या संस्कृतिक कला गुणांना वाव देवून विकास करणे
  • पारंपरिक व आधुनिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण
  • आपत्कालीन व्यवस्थापणाचे प्रशिक्षण
  • पूर्णवेळ कार्यरत समुपदेशक
  • पोषक व संतुलित आहार
  • अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण
  • अध्यावत एक्टिविटी सेंटर
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व संडास-बाथरूमची सोय
  • आंघोळीसाठी गरम पाणी
  • वाय-फाय कॅम्पस
  • ऑनलाइन सी.सी.टी.वी कॅमेरा व स्पीकर
  • मुलांच्या मानसिक आरोग्याची मनोसोपचार तज्ञ
  • मुलांच्या औषध उपचारांसाठी नर्स
  • मुलांची काळजी घेण्यासाठी काळजी वाहक

शाळेत प्रवेशासाठी नियम व अटी

  • शाळेमध्ये वयाच्या १८ वर्षापुढील मतिमंद मुलांना प्रवेश दिला जाईल.
  • प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे मतिमंद असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट व ४ फोटो .
  • शाळेचा दाखल व जन्माचा दाखला,आधार कार्ड,रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.
  • जर मुलांचे मेडिकल सर्टिफिकेट नसेल तर आमच्या संस्थेतर्फे, सिव्हिल हॉस्पिटल मधून मेडिकल सर्टिफिकेट काढून, देण्यात येईल.
आधिक माहीत साठी खाली दिलेल्या फोन नंबर संपर्क करा.

घरभेट मार्गदर्शन फॉर्म

आपल्या पाल्यासाठी घरी येऊन माहिती सांगण्यासाठी फॉर्म भरून द्या. लवकरच आमचे शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी येतील.

शालेय उपक्रम

envet1

योग दिन

जागतिक योग दिन निमित्त कार्यशाळेतील सर्व विदयार्थ्यान समवेत शिक्षक स्टाफ योग दिन साजरा करतानाच दृश...

envet1

आरोग्य तपासणी

शालेय विदयार्थ्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली.

envet1

दिवाळी

दिवाळी निमित्त कार्यशाळेतील सर्व विदयार्थ्यानी बनवलेले वस्तूंचे स्टॉल

envet1

स्वातंत्र्यदिन

सर्व विदयार्थ्यांती व शिक्षक समवेत स्वातंत्र्यदिन साजरा करताना

envet1

रक्षाबंधन

विद्यार्थ्यांनी सर्व लेडीज स्टाफला ग्रिटिंग कार्ड गिफ्ट करून रक्षाबंधन सण साजरा केला.

envet1

गुरुपौर्णिमा

शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत गुरुपौर्णिमा साजरी करतानाचे दृश्य.

envet1

बेंदूर

श्री. सदगुक घोडीराज महाराज मंदिर पलूस येथे महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुचा विक्री साठीचा स्टॉल

envet1

शेती विभाग

कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान तसेच बागबगीची देखभाल करतानाचे दृश्य.